आताशा नसते भान, कोषात लपते मन, शोधिते नापिक माती, माजते वृथाच रान. कोणते वैफल्य आहे, कसली मनिषा होती. आकार ढगांचे सारे, आकाश व्यापत जाती. भासांची क्षितिजे जेव्हा, रंगानी माखुन गेली उतरी अंतरी माझ्या, मोहांची गर्दीच झाली. श्वासांनी हुंगला गंध, पसरे सुगंध गान शब्दांची फसवी भाषा, अर्थांचे उठले रान. आताशा नसते भान, कोषात लपते मन, शोधणे संपूनी सारे, पाचोळा होतसे पान.
17 likes
45 shares