Back to feed
M
Manav Kulkarni Love · Marathi · Missing

आपण जिच्यावर प्रेम करतो तिच्या आठवणीत नेहमी झुरतो डोळ्या समोर निरागस चेहेरा तिचा येतो फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो.. दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते कारण ती आपल्या हृदयात असते.. प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते.. क्षण भर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो.. स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो भास होत आहे हे जेव्हा मला कळते तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते.. जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो नियतीच्या खेळा पुढे मी कसा हरतो.. आपण जिच्यावर प्रेम करतो पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो.. पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो.. हृदयात साठवलेल्या कित्येक आठ्वणी आहेत.. पण त्या सांगताना मन गहिवरत.. कसं सांगाव हे सगळ् तुला.. तुला नजरे समोर पाहिल कि मन पण अडखळत..

0 likes 0 shares
WhatsApp