*आपला माणूस पारदर्शीच* एखादा माणूस आपल्या प्रयत्नातून जर यशाची शिखरं गाठत असेल तर त्याला समाजातील कंठक खांद्यावर घेण्याऐवजी त्याच्यावर चिखलफेक करू लागतात. यातीलच एक प्रकार सध्या महाराष्ट्राचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बाबतीत घडत आहे. तो म्हणजे "सहकार मंत्र्यांच्या लोकमंगल ने भ्रष्टाचार केल्याच्या धाधांत खोट्या आवया उठवल्या जात आहेत." ज्या माणसानं आयुष्यभर जनसेवेला वाहून घेतलं, दिनदुबळ्या माणसांना आधार झालेला हा माणूस. 2500 मुलींचे विवाह, 340 निराधार वृद्धांना मोफत दोन वेळचे भोजन, हजारो तरुणांना रोजगार हे स्वतःच्या पैशातून सरकारकडून कोणतीही मदत न घेता करणारा देवमाणूस. पशुपालक ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. हि गोष्टच मुळात विरोधकांना पचनी पडेनाशी झाली आहे. "ना खाउंगा ना खाने दुंगा" म्हणत भारतीय जनता पार्टीचे सरकार नरेंद्र मोदींच्या रूपानं सत्तेवर आलं. त्यापाठोपाठ राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं भ्रष्टाचार मुक्त निष्कलंक सरकार गेली 2 वर्षे विकासाच्या सर्वस्वी प्रयत्नात आहे. हे सर्व विरोधकांना शांतपणे पहावं लागतंय म्हणून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांवर चिखलफेक सुरु केली गेली. वास्तविक पाहता लोकमंगल साखर कारखाना 15 वर्षांपूर्वी सुरु झाला. ज्या शेतकऱ्यांनी जेवढे पैसे गुंतवले होते त्यांना त्या रक्कमेच्या 3-4 पट फायदा, सुविधा आता पर्यंत मिळाल्या आहेत. त्याबाबतीत कुठेही भ्रष्टाचार , गैरव्यवहार झालेला नाही हे शेतकरी स्वतः सांगतात. यामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या शेअर्सची माहिती कायद्याच्या अनियमीततेमुळे शेतकऱ्यांच्या शेअर्सची नोंद सेबीकडे झालेली नाही. त्यामुळे सेबीने फक्त ते नोंद करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. पण आतापर्यंतचे इन्कम टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, टीडीएस, सरकारचे सर्व कर नियमित भरले गेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत सरकारची किंवा शेतकऱ्यांची काडिमात्रही फसवणूक झाली नाही. सुभाष बापूंनी सहकार मंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातीलच वि.वि. सोसायटी 7/12 सभासद धोरण या निर्णयामुळे स्थानिक राजकारण अन विरोधी पक्षाची आर्थिक सत्ताकेंद्र आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या धसक्याने बावचळलेले विरोधक वाटेल ते बरळत आहेत. मात्र मीडियाने डोळसपणे या गोष्टीचा बाऊ न करता जनतेला सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. नाव मोठं करायला वेळ लागतो पण ते घालवायला काही वेळ लागत नाही. विरोधकांमध्ये असे कित्येक नेते आहेत ज्यांनी हजारो हजारो कोटींचा घोटाळा, भ्रष्टाचार केला तरीही निर्ढावल्या प्रमाणे समाजात जगतात. जनमाणसांचे बापू एक कवडी सुद्धा कधी घेणार नाहीत कारण आपल्या भाकरीतला घास दुसऱ्याला देणारा आपला माणूस कधीच बैमानगीरी करणार नाही आम्हाला आशा नाही तर ठाम विश्वास आहे. पण विरोधकांनी हे विसरू नये कि उगीच राड उडवून आपलाच अगोदर डाग लागलेला पंचा खराब होतोय. मी_कट्टर_बापूंचा_माणूस आपला_माणूस_निष्कलंकीत_मा णूस
106 likes
15 shares