" आपलच माणूस लागतं " : " आनंदात असताना .. सुखात भागीदार .. कुणीही चालतं, पण दु:खात रडताना .. अश्रू पुसायला .. : आपलंच माणूस लागतं .. घोळक्यात असताना .. दंगामस्ती करायला .. कुणीही चालतं.., पण एकांतात असताना .. गुपित सांगायला .. : आपलंच माणूस लागतं .. वरवरच्या जखमांना .. फुंकर घालायला .. कुणीही चालतं .., पण मनात .. खोलवर रुतलेल्या जखमांना .. : आपलंच माणूस लागतं .. काळाच्या अंधारात .. विरणार्या आठवणींसाठी .. कुणीही चालतं .. पण मनाच्या .. कप्प्यात घर करण्यासाठी .. : आपलंच माणूस लागतं .. कायमचंच रुसण्यासाठी .. अबोला धरण्यासाठी .. कुणीही चालतं .., पण आपल्यावर .. रुसण्यासाठी .. रुसवा आपला .., काढण्यासाठी.. : आपलंच माणूस लागतं .. यशाच्या शिखरावर .. बेहोश होण्यासाठी .. कुणीही चालतं.., पण अपयशाच्या दरीत .. तोल सावरण्यासाठी .. : आपलंच माणूस लागतं ... आपलंच माणूस लागतं ... " : अशा आपल्या माणसांना .... सर्वे भवन्तु सुखिन:
239 likes
73 shares