आपल्याला अनेक गोष्टी अगदी वेळेवर हव्या असतात. वेळेवर एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण चिडचिड करतो, इतरांवर राग व्यक्त करतो. अनेकदा या गोष्टी वेळेवर मिळत असताना मात्र ज्यांच्यामुळे हे शक्य झालं त्यांचा साधा विचारही आपण करत नाही. आता हीच मंडळी पहा ना - सकाळी चहाच्या पहिल्या घोटाबरोबर आपल्याला वर्तमानपत्र वाचायला मिळावं म्हणून ही मंडळी पहाटे ३:३० - ४ पासून कामाला लागतात. वेगवेगळ्या दैनिकांचे गठ्ठे मिळविणं, त्यामध्ये पुरवण्या लावणं हे सगळं राम करतात. आणि आपल्या घरापर्यंत तो अंक पोहचवतात. पण त्यांचे आभार मानण्याचं सौजन्यही आपण दाखवत नसतो. वितार करा त्यांच्या जागी आपण असतो तर, कुणी आभार व्यक्त केल्यावर आनंद वाटला असता ना ? पेपरवाल्यांपासून झाडूवाल्यांपर्यंत वेळेवर सेवा देणाऱ्सांचे आभार माना, त्यांचा हुरुप वाढेल.
115 likes
45 shares