N
Navya Reddy
Love · Marathi · Friendship
आमचं प्रेम आधी एसएमएस नंतर कॉल, मग मैत्री आणि आता खूपच जवळची व्यक्ती असं टप्प्याटप्प्यान ं फुलत गेलं. माझं प्रेम मोबाईलवरच बहरलं. ती आणि मी कधी एकत्र आलो, कधी जवळ आलो हे कळलंच नाही. मला अशी एक व्यक्ती मिळाली जिचा मला आधार वाटतो. मन मोकळं करण्यासाठी जवळची मैत्रीण मिळालीये. तिला मी माझी स्वप्न सांगू शकतो. तिचं मन मी समजू शकतो. नातं कसं टिकवायचं हे तिनंच शिकवलं. तिने मला बोलायचं कसं ते शिकवलं, तिच्यापेक्षा मोठा असलो तरी कधी-कधी तीच मोठी असते. माणसांना जोडायचंकसं, नवे मित्र कसे बनवायचे सारं तिच्या बोलण्यातूनच मी शिकलो. आमच्या नात्याला गालबोट लागू नये म्हणून आता झटायचं आहे. एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची आहे. एवढं नक्की !
0 likes
0 shares