Back to feed
I
Ishaan Gupta Life · Marathi · Life

आम्ही एक सर्व्हे करत आहोत, आपले सहकार्य अपेक्षीत आहे. खाली आम्ही नवऱ्यांचे काही प्रकार देत आहोत. आपला नवरा यापैकी कुठल्या प्रकारचा आहे ते ओळखा व आम्हांला कळवा. नवऱ्यांचे प्रकार: *१) प्रेमळ:* ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस! *२) उदार:* तुला हवी ति साडी घे. *३) समजुतदार:* तु आज खूपच दमलेली दिसतेस, चल आज बाहेर जेवायला जाऊ. *४) हौशी:* तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ. *५) प्रामाणीक:* मित्राने खूप आग्रह केला, पण मी फक्त दोनच पेग घेतले. आणी सिगरेट तर ओढलीच नाही. तुला शब्द दिलाय नां? *६) एकनिष्ठ:* अगं, ती xxxx माझी शाळेतली मैत्रीण. पण स्वभावाने एकदम खडूस, तुझ्यासारखी मनमिळावू नाही. *७) कष्टाळू:* ऑफिस मधून येताना भाजी घेऊनच आलो, उगाच तुला परत मंडईत जायचा त्रास नको. *८) आज्ञाधारक:* मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणी मगच कळवावं. *९) स्वाभिमानी:* मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे कां? *१०) काटकसरी:* मोत्यांचा नेकलेस काय करायचाय? मण्यांची माळ घातलीस तरी चालेल. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं. *११) धाडसी:* तुझी आई आणखीन किती दिवस राहाणार आहे? *१२) मितभाषी:* हो! *१३) खंबीर:* तु म्हणशील तसं, तू आणी मी काय वेगळे आहोत कां? *१४) आर्जवी:* मी चहा करणारच आहे, तूही घे नां! तरी आपला नवरा वरीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ते लवकरात लवकर कळवणे. *आपला नवरा कोणत्याही प्रकारचा नसल्यास आम्ही जबाबदार नाही.* आपलंच नशीब खोटं असं मानून गप्प बसावे 🙄😀

190 likes 65 shares
WhatsApp