Back to feed
A
Arjun Reddy Patriotic · Marathi · Patriotic

*आरक्षण....* या शब्दाने अवघा देश पेटुन उठतो. या आरक्षणासाठीच आज लाखो लोक रस्त्यावर येत आहेत. पण ज्या समाज घटकांना खरोखरीच आरक्षणाची गरज होती, त्यांना डाँ.आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातुन ते सहज बहाल केले आहे. त्याची जाण या सर्व समाजघटकांनी ठेवली पाहीजे. याच भावना महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते व कवी जगदीश ओहोळ यांनी *आरक्षण* या परखड कवितेतुन व्यक्त केल्या आहेत... लाखांच्या मोर्चाचं काम एकट्या भीमानं केलं तु न मागताच मित्रा तुला भीमानं आरक्षण दिलं...। हजारो मनुवाद्यांपुढं भीम लढला लेखणीच्या तलवारीनं भले भले झाले गार एकट्या भीमाच्या कर्तबगारीनं आरक्षण लाटतोय तु पण तुला भीमाचं ध्यान नाय झालं.. तु न मागताच मित्रा तुला भीमानं आरक्षण दिलं...। आरक्षणाची भीक म्हणुन कायम तुला हिणवलं एका दारुच्या बाटलीवर मतदार राजा तुला बनवलं इथंच भीमाचं सारं कष्ट वाया गेलं.... तु न मागताच मित्रा तुला भीमानं आरक्षण दिलं...। ज्यानं हिणंवलं तुला त्यालाच आरक्षणाचं महत्व आता समजलं भीमाच्या दुरदृष्टीचं गुपित सा-या जगाला आता उमगलं मागास म्हणुन हिणवणारेच आता स्वत:ला मागास ती रं बोलं... तु न मागताच मित्रा तुला भीमानं आरक्षण दिलं...। भीमाच्या मनी नव्हता कधी कुठलाच जातीभेद त्यालाच जातीत आडकवला याचाच वाटतो खेद फक्त बौध्दच नाही तर सा-या भारतीयांसाठी भीमानं कार्य केलं.. तु न मागताच मित्रा तुला भीमानं आरक्षण दिलं...। कवी - जगदीश ओहोळ, पुणे संपर्क - 9921878801 *आरक्षणाचा लाभ घेणा-या व आरक्षण मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येका पर्यंत ही कविता पाठवा.*

38 likes 27 shares
WhatsApp