आरेवाडी :: बिरोबा बन महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश आदि राज्यांतील नागरिकांचे आराध्य दैवत. तिथं माणुस येतो आणि आपली तहानभुक विसरतो. तेथिल वातावरणात तो तल्लीन होऊन जातो. अमावस्या, रविवार आणि इतरही भक्तगण बिरदेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारोंच्या संख्येने येतात. चैत्रात असणाऱ्या यात्रेत आठदहा लाखात यात्रेकरू येतात. या श्रद्धापीठास वैचारिक परिवर्तनाचे पीठ निर्माण होण्यासाठी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. हे श्रद्धास्थान धनगर जमीतीचे चिंतनाचे स्थान होत आहे. जमातीच्या अनेक विषयांचे मंथन या मेळाव्यात होणार आहे. माळेगाव येथे सहा महिन्यापूर्वी धनगर मेळाव्याचे मा गणेश हाके यांनी आयोजन केले. यात्रा होती, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मेळाव्यास उपस्थित होते. तिथेही चिंतनाचा प्रयोग यशस्वी झाला. दसरा मेळाव्यात प्रचंड संख्येने उपस्थित रहावे. आपण नाहीतर वर्षातून सर्वजन एक वेळा, अनेकजण अमावस्येस, रविवारी बिरोबाला येतोच. नवरात्रात अनेक भाविक झाडपीडी निमित्त नऊ दिवस निवासी असतात. आपणही एक दिवस नवरात्रात बिरोबाला या. तोही दिवस शुक्रवार ७ ऑक्टोबर हाच नियोजित करा. श्रद्धापीठ धनगर जमातीचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय चिंतन/मंथनाचे वैचारिक पीठ होत आहे. महाराष्ट्रातील प्रतेक वस्तीवरील किमान एक बांधव या मेळाव्यास उपस्थित रहा. सोलापूर जिल्ह्यातील बांधवांना आवाहन, आपण प्रत्येक गावातून किमान एकदोन गाड्या घेऊन याव्यात. सांगलीतील शिरोळपासून पुर्वेस जतपर्यंतच्या जमातबांधवांनी आपापल्या गावात प्रतेकास घरटूघर दसरा मेळाव्याचा संदेश पोचवा. तरुणांनी ह्यात पुढाकार घेऊन कुटुंबातील किमाम दोन सदस्य मेळाव्यास उपस्थित रहावयासच हवेत असे प्रबोधन करा. काम आहे, ते रोज असणारच, काम नाही असा दिवसच असु शकत नाही. त्यामुळे आपले कामास एक दिवस विश्रांती देऊन दसरा मेळावा आणि बिरोबा दर्शन या दोन्ही हेतुने कुटुंबासहीत आरेवाडीला या. अत्यंत महत्वपूर्ण काम असल्यास आपला प्रतिनिधि तिथे जाईल अशी व्यवस्था करा. दसरा मेळावा हा कोनत्याही नेत्याच्या नेत्रुत्वाखाली नसुन तो फक्त राजमाता अहिल्यादेवी,मल्हारराव होळकर,यशवंतराव होळकर,बीके कोकरे यांचा फोटो स्टेजवर लावुन सर्व नेत्यांनी खाली बसुन मेळाव्यात भाग घेवुन नवीन तरुनांचे मार्गदर्शन ऐकावे तसेच आरेवाडी भागामध्ये मेळाव्याच्या जागी कोनत्याही नेत्यांचे डिजीटल नसनार फक्त समाजातील महापुरुषांचे फोटो असनार असी चर्चा झाली आहे
7 likes
23 shares