Back to feed
K
Krishna Yadav Love · Marathi · Missing

उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला , प्रेम म्हणायचं असत . एकमेका आठवायला आणि आठवणी जपण्याला प्रेम म्हणायचं असत . थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत . भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत . कितीही रागावल तरी एकमेका सावरायला प्रेम म्हणायचं असत . शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद होण्याला प्रेम म्हणायचं असत . तुझ माझ अस न राहता "आपल" म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत .

0 likes 0 shares
WhatsApp