Back to feed
N
Nikhil Bhat Rain · Marathi · Rain

उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली. उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली

151 likes 55 shares
WhatsApp