ऊर्वरीत कथा फ्रेंड्स............ °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° पैसे जमा करायला ये तो तेव्हा ईशांत बोलतो कि, ईशांत - रक्म जमा करायची होती मॅडम, ईशाच्या ऑपरेशनचे मॅडम - ठिक आहे द्या (रिसीट देताच तो तिच्या आईकडे जातो ) ---------------------------- ईशांत - आई पैसे मी जमा केलेत आणि आज पहाटे पाच वाजता ऑपरेशन करतील, तुम्ही काळजी नका करु आई - पण बाळा, तू कोण आहे आहेस ?? ईशांत - आई मी तोच आहे, जो तुमच्या मुलीचा सर्वात चांगला मित्र आहे आई - पण तिने मला तुझ्याबद्दल काहीच नाही सांगितल ईशांत - आई सांगितल असेल मी तुम्हाला पण विसरले असतील तुम्ही आई - असे काहीतरी असेल ईशांत - आई, थोडावेळ आराम करा, मी आहे ईथच आई - नको रे बाळ, असूदे ईशांत - बरं....! पण आई ईशाला असा त्रास कधीपासून होत आहे? आई - ती चौथीत असल्यापासून हा त्रास होतोय आणि हे आम्हाला नाही समजल, पण जेव्हा समजल तेव्हा मग ठरवल आम्ही कि, हिला जास्त त्रास नाही द्यायच (अशाप्रकारे यांचे गप्पा रंगत गेले आणि काहीवेळाने डॉक्टर आले अन् बोलले कि, तुम्हाला ईथे सही करावं लागेल; तर तिच्या आईने सही केल आणि बोलली कि,) आई - कितीवेळ लागेल ऑपरेशनला? डॉक्टर -दोन तासाचा असू शकतो आई - ठिक आहे डॉक्टर, पण माझी मुलगी ठिक होईल ना डॉक्टर, प्लिज तिला वाचवा तुम्ही (खूप रडत रडत बोलते) डॉक्टर - हे पहा, आम्ही आमचे प्रयत्न करु, बाकी परमेश्वरकडे (अस बोलून डॉक्टर जातात आणि ईशांत आईला खूप समजावतो आणि काहीवेळ तिला झोपायला सांगतो, तर आई झोपतीही आणि सकाळच्या सहावाजता जाग येते तर ती ईशांतला विचारते) आई - झाले का रे ऑपरेशन? ईशांत - चाललय आई (तेवढ्यात ऑपरेशन करुन बाहेर येतात) ईशांत -डॉक्टर ...... डॉक्टर -ऑपरेशन सक्सेस झाल, पण तिला आराम करुन द्या आणि तुम्ही माझ्या केबीनमधे या दोही (दोघही जातात केबीनमधे) ईशांत -बोला डॉक्टर डॉक्टर - हे पहा, आता मी तुम्हाला जे सांगणार ते नीट समजून घ्या आणि तिला तर अजिबात कळून नका देऊ आई - काय.......?? बोला ना डॉक्टर तिला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि घशात खुप असे छिद्र पडलेत ईशांत -पण तिच आयुष्य आता अजून किती दिवस आहे?? आई -हा डॉक्टर प्लिज सांगा डॉक्टर -छातीत जर छिद्रे आली असती तर ती निदान सहा महिने तरी जगू शकली असती, पण घशातून अन्नाचे कण खायचे असतात, म्हणून तिथल्या जागेत जोर पडतो म्हणून तो भाग जास्त दुखून आणि खोकला येऊन बर्याचवेळा रक्तही जाउ शकतो आणि तिच्यावर जेवढ होईल तेवढं हसवत रहा आई -डॉक्टर, पण ठिक होईल ना हो ती, कारण आम्हाला एकमेकांशिवाय कुणिच नाही (रडत बोलते) ईशांत - प्लिज आई नका रडू तुम्ही डॉक्टर -हा एक महिना तरी नीट संभाळा तिला आणि औषधं वेळेवर देत जावा (अस बोलून डॉक्टर जातात) (काहीवेळाने तिला शुद्धी येते आणि तिचा चेहराही खूप नाराज असतो, तर तिची आई तिला सांगते कि, आज याच्यामूळेच तू पाहू शकत आहेस आणि याने मला सर्व सांगितलय तुमच्याबद्दल; मला वाटतंय कि, तुझ लग्न याच्याशीच व्हावं, कारण यापेक्षा जास्त चांगला मुलगा कुठेच मिळणार नाही. हे ऐकूण ती बोलते कि, मला आता आराम करून द्या आणि घरी गेल्यावर आपण याविषयावर बोलूया) •••••••••••••••••••••••••• नऊ दिवसांनी तिला डिस्चार्ज भेटतो आणि घरी गेल्यावर चार दिवसांनीच ती तिच्या आईला म्हणते कि, आता आपल्याला काही खर्च नाहीये म्हणून मी अस म्हणत आहे कि, ईशांत बरोबर माझं लग्न व्हावं आणि जास्त मोठ नाही केल तरी चालेल; हे सर्व ऐकूण तिची आई बोलते कि, " आडज मी खूप खूश आहे बाळा, कारण माझ्या मनाच जडपणा तू हलके केलीस...... हे सर्व काही सक्सेस करुन महिण्याच्या आतच त्यांच लग्न होऊन जातं, पण जेव्हा ते ब्राम्हणला विचारतात कि, या दोघांची कुंडली कशी आहे? सांगा हो जरा.......तर ते सांगतात कि, मुलाच्या जन्मात सुख नाहिये आणि या मुलिला आता जे रोग आहे तर ती त्या रोगाने न मरता, ती अजून सहा महिने तरी सुखाने जगून ती सर्वांना सोडून जाईल. ------------------------------- हेसर्व ऐकूण ते घाबरतात आणि घरी जाऊन परत नॉर्मल होतात, ईशांतला मात्र जॉबमूळे वेळ नव्हता मिळत; कारण त्याचा कामाचा लोड खूपच वाढल्याने त्याला आणि तिला काहीच सुचत नव्हते पण आनंदाची बातमी म्हणावं तर आज चार महिणे उलटून गेले तरीही ईशा खूप खुश आहे, त्या ब्राम्हणच बोलणं शक्यच झालं म्हणावं आणि तिचा घशातला प्रॉब्लेमही बराचसा सॉल्व्ह झाला. ---------------------------- पण दुर्दैव असं कि, एकेदिवशी ईशांतच्या बाईकला प्रॉब्लेम येतो आणि तो ईशाला फोन करुन बोलावून घेतो, कारण रिमझिम पावसामूळे बॅकसाईडला गाड्या जात नव्हते म्हणून तो तिला ऊजेड असतानाच बोलावला आणि ती लगेच निघाली; अर्ध्यारस्त्यात येताच तिच्या गाडीवर अजगरचा पिल्लू पडतो आणि ते पाहून ती खूपच घाबरती अन् गाडी थांबवायच्या भानगडीत खूप जोरात स्लिप होउन झाडाला आदळते आणि तिचे डोकं एका ओट्याच्या दगडावर आपटून मेंदूच्या शिराला धक्का पोहोचतो आणि तेवढ्यात एक अनोळखी माणूस तिच्याकडे येऊन तिला उठवतो आणि तो तिला पाहताच ओळखतो अन् तिला लगेच तिच्या घरी पोहोचवतो; तर ईशांत तिचा फोन ट्राय करतो पण दुसराच माणूस उचलितो आणि सर्व सांगतो तर हे सर्व ऐकूण त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो तसाच घरी पळत सुटतो. रस्त्यातच तो रडत घरी येतो आणि तिला पाहून तो खूपच सेंटी होतो; पण आजही तो द्रुष्य आठवल्यावर डोळ्यातले अश्रू नाही थांबत......... ------------------------------ आणि हि घटना खरोखर कोकण भागात घडलेली आहे, कारण मलाही एकाने हि कथा अनुभवूनी सांगितलेली आहे, म्हणून आज मी तुमच्यासमोर आणलोय………
101 likes
22 shares