Back to feed
D
Diya Bhat Friendship · Marathi · Friendship

एक कविता मैत्रीसाठी *मैत्री* शब्दही न बोलता अबोल साथ करते, *ती मैत्री*....... गवगवा न करता एकलेपण मिटवते, *ती मैत्री*....... खूप व्याप असतानाही आवर्जून आठवण काढते, *ती मैत्री*........ हज्जार शब्द सांगत नाहीत ते एका शब्दात कळवते, *ती मैत्री*....... उद्‍वेगल्या मनाला शीतल शांतवते, *ती मैत्री*......... आपली चूक कबूल करून मनात राग न धरता परत पहिल्या सारखीच राहते *ती मैत्री*...... आपल्यातलं आपलं माणूस अचूक ओळखून आपलेपणानं आपलेपण जपते *ती मैत्री*........ कितीही वादळं आली तरी खंबीरपणाने आपल्या सोबत राहते *ती मैत्री*......... स्त्री पुरुष हे सगळे बंध तोडून निर्व्याजपणे संगत करुन साथ निभवते *ती मैत्री*......... अाणि वयाचं अंतर न बाळगता एकमेकांना समजू शकते *ती मैत्री*........HAPPY FRIENDSHIP DAY....

104 likes 51 shares
WhatsApp