॥एक क्षण प्रेमाचा॥ एक क्षण प्रेमाचा देण्याचा नि घेण्याचा ओठावरच्या गाण्याला नवे सुर देण्याचा ॥ एक क्षण प्रेमाचा आठवणीत रमण्याचा गतकाळातील स्मृतिँना नवा उजाळा देण्याचा ॥ एक क्षण प्रेमाचा वसंताच्या उत्साहाचा गरगळलेल्या मनाला नवपल्लवीत करण्याचा ॥ एक क्षण प्रेमाचा भावबंध जुळण्याचा जुळलेल्या नात्यासंगे एकरुप होण्याचा ॥ एक क्षण प्रेमाचा कृतज्ञता अनुभवण्याचा कृतकृत्य डोळ्यामध्ये कृतार्थता पाहण्याचा ॥
0 likes
0 shares