एका छोट्याशा गावात राहणारे किशोर आणि सुजाता यांचं एकमेकांवर गेली पाच वर्षे खुप प्रेम आहे.पण काही कारणामुळे ही गोष्ट त्या मुलीच्या आईवडीलांना कळते ते या लग्नाला नकार देतात.आणि किशोरला पंचायतीसमोर उभा करुन त्याला जाब विचारतात.त्यावरतो म्हणतो,आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे.सुजाताला पंचांच्या विचारण्यानंतर ती ही त्याच्या हो ला हो म्हणते.पण ते वेगवेगळ्या जातीचे असल्याने पंचायतीकडुन त्यांच्या लग्नाला नकार मिळतो.आणि म्हणुन ते पळुन जाऊन लग्न करण्याचं ठरवतात. गावातलाच मुलगा चंदु त्यांना पळुन जाण्यास मदत करतो.त्यांना हवा असलेलं सर्वकाही,पैसे,त्यांची शहरात राहण्याची व्यवस्था करुन त्यांचं लग्न लावुन देतो.एक वर्षभर त्यांचा संसार खुप चांगला चालतो,पण इकडे त्या दोघांच्या मागावर असलेले,त्या मुलीचे काका,वडील या सर्वांना एकदिवस त्यांचा पत्ता लागतो.ते त्या दोघांना मारहाण करतच शहरातुन गावात आणतात।किशोरला तर इतकी मारहाण करतात की तो बेशुद्धच पडतो,मग त्याला सर्व गावासमोर व सुजातासमोर फरफटत नेऊन झाडाला लटकवतात,सुजाता तिच्या सर्व नातलगांकडे रडतरडत त्याच्या जीवनाची भीक मागत असते.पण ते शेवटि त्याला फासावर लटकवतातच.आणि नदीत फेकुन देतात.आणि तिला मारहाण करुन अंधार्या खोलीत कोँडुन टाकतात.पण चंदु तिला तशा अवस्थेतुन सोडवतो. ती तिथुन पळुन थेट पोलीस स्टेशनपर्यँत जाते आणि चंदुच्या मदतीने स्वतःच्याच घरच्यांच्या विरुद्ध F.I.R करते.हा काळ तिच्यासाठी कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नसतो.पोलीस तिच्या काकांना,वडिलांना व इतर नातलगांना अटक करुन घेऊन जातात.ही केस चंदु मिडीयाद्वारे जगासमोर आणुन देतो.त्यासाठी सुजाता,चंदु आणि गावकर्याँची मुलाखात घेतली जाते ती मुलाखत टीव्हीवर जेव्हा पुर्ण देश बघतो.तेव्हा सर्व स्तरावरुन या घटनेचा मोठ्या प्रमाणावर विरोध होतो.जागोजागी लोक मोर्च्या काढुन,विरोधदर्शक पाट्या दाखवु या घटनेचा निषेध करतात।या घटनेने देशाला अशा स्तरावर उभं केलंय जिथे क्रांतीचि सुरुवात होते।केससाठी लागणार्या मदतीसाठी सामाजिक संस्था आज पुढे आल्यात तर ते फक्त चंदुमुळे.यादरम्यान ती छोटंमोठे काम करु लागते.चंदु सुजाताला स्वतःच्याच घरात आश्रय देतो.पाच वर्षे चाललेल्या या केसचा आज निकाल लागणार आहे,पुर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागुन राहीलंय.आजच्या निकालाने इतिहास रचला त्या पाच जणांपैकी चारजणांना फाशीची शिक्षा आणि एकाला 25 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली जाते.लोकांमध्येजल्लोषाचं वातावरण आहे,लोक फटाके,गुलाल उधळुन हा विजय साजरा करताहेत.सुजाताच्या तर आनंदाला पारावारच उरला नव्हता।अर्जुनालाही स्वतःच्या नातलगांविरुद्ध बाण उचलताना इतक्या पेचप्रसंगांचा सामना करावा लागला नसेल,जितका सुजाताला करावा लागला.अर्जुनाच्या मार्गदर्शनाला जसा सारथी म्हणुन कृष्ण होता तसाच इथं सुजातासंगे चंदु होता.दोघांनी एकमेकांचं खुपच अभिनंदन केलं. आणि आज चंदु तिला म्हणाला,आज किशोरच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल पण खर्या अर्थाने त्याच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल,जेव्हा तु लग्न करशील,सुखी राहशील...ती म्हणते या घटनेनंतर मला नाही वाटत मी किशोरला कधीच विसरु शकेन.आणि तरीही या घटनेनंतर माझ्याशी कोणी लग्न करेल असं मला तरी नाही वाटत.तुझी हरकत नसेल तर मी लग्न करेन तुझ्याशी,आणि तेही तुझी इच्छा असेल तरच....तिने थोडा विचार करुन लग्नाला होकार दिला.सर्वगावकर्याँसमक्ष त्यांच लग्नही झालं.आज दहा वर्षानंतर ते सुखी संसार जगताहेत.पण या दहा वर्षात असा एकही दिवस गेला नाही की किशोरच्या फोटोवर हार चढवल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात झालीय......मित्रांनो प्रत्येक प्रेमकहानीला एका सत्वपरिक्षेला सामोरं जावंच लागतं त्याशिवाय ती कधी पुर्णच होत नाही.अशावेळी येणार्या संकटाला धैर्याने जो सामोरं जातो तोच यामध्ये विजय मिळवतो.अशावेळी स्वतःला कमी किँवा एकटं समजण्याची चुक करु नये.मी एकटा काय करणार असं समजण्याची चुक कधीच करु नये.ती व्यक्ती तुम्हीच आहात जी सर्वकाही करु शकत
89 likes
26 shares