एक छान काव्य रचना... *👉गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,* *माणसं तडतड करत आहेत.* *काय झालंय कळत नाही,* *फारच चीडचीड करत आहेत.* *नातेवाईक असो, मित्र असो,* *भयंकर स्पर्धा वाढलीय.* *तेंव्हापासूनच माणसाची,* *मानसिक अवस्था बिघडलीय.* *कुणी कुणाला काहीच विचारीना,* *मनानचं कसंही वागायलेत.* *आजूबाजूच्या लोकांकडून,* *जास्तच अपेक्षा ठेवायलेत.* *कमाई किती, खर्च किती,* *काहीच कुठे मेळ नाही.* *भेटायला जाणं, गप्पा मारणं,* *आता कुणालाच वेळ नाही.* *कॅपॅसिटी नसतांनाही,* *खरेदी उगीच करायलेत.* *Salary व्हायलीय कमी,* *अन हप्तेच जास्त भरायलेत.* *शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,* *की हा घेतो फोर व्हीलर.* *दूध बॅग आणायला सांगितली की,* *मोजीत बसतो चिल्लर.* *अरे, अंगापेक्षा बोंगा,* *कशाला वाढवून बसतो.* *पगार जरी झाली तरी,* *उदास भकास दिसतो.* *पर्सनल लोन, Gold लोन,* *जे भेटेल, ते घ्यायलेत,* *दिलेले पैसे मागितले तरी,* *गचांडीलाच धरायलेत.* *सहनशीलता आणि संयम,* *कुठे चाललाय कळत नाही,* *पॅकेज भरपूर मिळायलंय,* *पण, समाधान काही मिळत नाही.* *घरी काय दारी काय,* *नुसत्या किरकीरी वाढल्यात.* *नवऱ्याला न सांगताच,* *बायकांनी भिश्या काढल्यात.* *कितीही साड्या, कितीही पर्स,* *शर्ट, पँटीला गणतीच नाही.* *तरीही कुरकुर चालूच असती,* *धड साडी तर कोणतीच नाही.* *मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,* *तुला अक्कल नाही.* *बायकोनं म्हणावं,* *तुम्हालाच काही कळत नाही.* *दोनदोन दिवस अबोला,* *कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.* *लग्न झालं की पोरं पोरी,* *वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.* *पत्नी पीडित नवऱ्याच्याही,* *संघटना निघत आहेत.* *डोळे मोठे करून पोट्टे,* *बापाकडेच बघत आहेत.* *दिवेलागण, शुंभकरोती,* *"स्वस्थ होऊ द्या", गायब झालं,* *शक्य असेल याच्यामुळेच,* *माणसां माणसात वितुष्ट आलं.* *चित्त थोडं शांत ठेऊन,* *जुनी पाने चाळावी लागतील.* *🤝यदाकदाचित पुन्हा माणसं,* *एकमेकाशी प्रेमाने वागतील.*
94 likes
82 shares