एक तरी मैत्रीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागुन आवाज देणारी . . आपल्यासाठी हसणारी वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी . . स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढुन ठेवणारी वेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची समजुत काढणारी. . वाकडं पाऊल पडताना मात्र मुस्कटात मारणारी . यशाच्या शिखरांवर आपली पाठ थोपटणारी . सगळ्यांच्या गलक्यात आपणास सैरभैर शोधणारी . . आपल्या आठवणीनं आपण नसताना व्याकुळ होणारी. . खरंच ! अशी एक तरी जीवा-भावाची "मैत्रिण " हवी जी आपणास मित्र म्हणवणारी
0 likes
0 shares