Back to feed
V
Vivaan Rao Friendship · Marathi · Friendship

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमधे आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. "तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. " सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल. पण नंतर उत्सुकता वाढली,माझी प्रगती रोखनारा नक्की कोण???? यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला. शवपेटित डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना. कारण शवपेटित एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटिच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, "या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः " कंटाळा, आळस, नाकर्तेपना, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टिमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त तुमच्यासाठी करत असता. तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्या ने बदलत नाही. ते बदलत फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलनार नाही. दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल. तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकाल जेव्हा ते तुम्ही स्वतः ठरवाल. अन्यथा या जन्मात ते कधीही कुणालाही शक्य नाही.

198 likes 64 shares
WhatsApp