Back to feed
A
Avni Mehta Life · Marathi · Life

एका धुसर संध्याकाळी.. गच्च धुकं झाकोळून येतं... पक्षांचा थवा घाबरून उडून जातो.. बोलकी झाडे स्तब्ध होतात... आणि आपलाच आतला आवाज ऐकू येतो! कातरवेळ कुरतडत जाते मनाच्या कोप-या कोप-याला... नीट रचून ठेवलेल्या मनाच्या भिंती धडाधड कोसळू लागतात... उत्तरं काही सापडत नाहीत आणि प्रश्नही संपत नाहीत... मनाचा कोलाहल वाढत जातो! प्रथम कुजबुज, मग हाक,मग आरोळी मग बोंबाबोंब, मग किंचाळ्या.. भयंकर विचका... हळूहळू त्याचा प्रतिध्वनि बनतो - वाटतं प्रकाशाच्या दिशेने धावायला हवं... छाती फुटेपर्यंत धावायचं.. डोळे मिटून फक्त धावायचं... अंतर संपत का नाही म्हणून डोळे किलकिलावे तर, भर चौकात माणसे जमलेली!... कुणीतरी हळूच कुजबुजलं, स्वत:शीच बोलतोय याला नक्कीच वेड लागलंय!...

61 likes 1 shares
WhatsApp