A
Atharv Deshmukh
Love · Marathi · Friendship
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी; अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागेलपणारी. एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी; माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी, एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी; पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीणअसणारी; आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी. एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी; मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.
0 likes
0 shares