Back to feed
R
Riya Reddy Love · Marathi · Friendship

एका मित्रासोबत माझे वाद झाले आणि मी रागाच्या भरात त्याचा मोबाइल नंबर माझ्या मोबाइल मधून डिलीट करुन टाकला. पण तो मित्रच शेवटी मी आजारी असल्याचे काळाल्यावर त्याने मला मेसेज केला. मित्रा कसा आहेस ? तब्यतेची काळजी घेत जा. माझ्या कड़े नंबर नसल्याने मी विचारले. I am fine ! Who are you. लगेच त्याचा कॉल आला आणि मला रागवायला लागला. काय रे, तुला हाउ (how) चे स्पेलिंग नीट लिहिता येत नाही का? चुकून how च्या ऐवजी who टाइप झाले असेल. आधी नीट हो मग तुला इंग्लिश शिकवतो. मी विचारात पडलो खरच मी किती मोठी चूक केली. मित्र असे तोड़ता येत नाहीत. मित्र असे तुटत नाहीत. जे खरे मित्र असतात ते चुकीच्या मेसेजचे देखील चांगले अर्थ काढ़तात

0 likes 0 shares
WhatsApp