Back to feed
K
Kiara Kumar Love · Marathi · Missing

एकटेच शब्द हे माझे सोबतीला सूर नाही डोळ्यांत दाटले अश्रू पण आसवांचा पूर नाहि हाचआहे तो किनारा येथेच झाली होती भेट आमुची अन् संपली जेथेच कहाणी तोही पत्थर आज दूर नाहि तू जिथे असशील तेथे पौर्णिमेचा चंद्र सदा नांदो आंधळ्या माझ्या नभाला मात्र चांदण्यांचा नूर नाहीच ही मेजवानी चालली माझाच केला घात त्यांनी पंगतीला यावे अन बसावे मी एव्हढा हि काही मजबूर नाहिच रात्र त्यांची नेहमीच झिंगलेली पण आत्मे मात्र अस्थिर शांत आहे झोप माझी अंतरी काहीच काहूर नाही…..

0 likes 0 shares
WhatsApp