Back to feed
M
Myra Joshi Life · Marathi · Life

*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.* *पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.* *एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.* *सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.* *तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...* *आणि* *या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...* *माणसाचं आयुष्य हे असंच असतं...* *त्याच्या हातात काहीच नसतं...* *आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...* *कर्ता करविता असतो तो ईश्वर...* *एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...* *मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...* *कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...* *"Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!"* *आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...* *कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...* *"समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला"...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?* *"चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं"...* *त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?* *"नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते."तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?* *एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...* *ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?* *त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?कोण सांगेल? कोण सांगेल कोण??कुणीच नाही...* *हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!* *मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..राजहंस मरताना सुद्धा गातो....* *दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.* *यालाच जीवन म्हणतात.* *किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळूनकारण या जगात उद्या काय* *होईलते कोणालाच माहित नसते...!!* *नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....* *कोणाचा अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका.....* *- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,* *पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....* *- कोणी कितीही महान झाला असेल,* *पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......* *स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......* *देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......🌟*फार सुंदर विचार आहेत नक्की वाचा🌟 *-स्वामी विवेकानंद*

168 likes 57 shares
WhatsApp