Back to feed
K
Kiara Mishra Life · Marathi · Life

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. . थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. . कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली. . तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. . शेजारी बिस्किटाचा पुडा होता. . तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. . त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!" . "माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!" . ती मनात विचार करत होती. . दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. . आता शेवटचे बिस्कीट उरले. . “आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का? मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ . ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली. . थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. . पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता. . आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. . एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. . तिने नजर टाकली, तर, शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते. . निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. . दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ??? . कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!! . "चांगली वस्तु" "चांगली व्यक्ती" व "चांगले दिवस" यांची "किंमत" निघुन गेल्यावर समजते... "प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत". . चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर किंवा निवांत ठिकाणी शांतपणे आठवणींना घेऊन बसावं. . आयुष्य जास्त सुंदर वाटत... . आपल्याला कोण हवंय, यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं. आयुष्य खरंच जास्त सुंदर वाटत... . आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, त्याच प्रमाणे, माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं. . आयुष्य जास्त सुंदर वाटत...😊😊😊

37 likes 22 shares
WhatsApp