Back to feed
R
Reyansh Bose Life · Marathi · Life

एकदा एक साधू कबीराला म्हणाला, "आज श्राद्ध आहे, तेंव्हा पितरांसाठी गोड खीर बनवायची आहे. त्यासाठी बाजारातून मला दूध आणून दे. त्यावेळी कबीर ९ वर्षांचा होता. कबीर दुधाचं भांडं घेऊन दूध आणायला निघाले. रस्त्यात त्यांना एक मेलेली गाय दिसली. कबीरांनी आजूबाजूचं गवत गोळा केलं आणि गायीच्या जवळ ठेवलं आणि तो तिथेच बसला. दुधाचं भांडं देखील बाजूला ठेवलं. बराच वेळ झाला, कबीर अजून आला नाही म्हणून त्याला शोधायला साधू स्वतः निघाला. काही अंतर चालल्यावर कबीर एका मृत गायीजवळ बसलेला त्यांना दिसला. साधूने त्याला विचारलं, "काय रे, दूध आणायला नाही गेला?" त्यावर कबीर म्हणाला, "महाराज, प्रथम या गायीला चारा तर खाऊ दे. चार खाल्यावर गाय दूध देईल ना?" साधू म्हणाला, "अरे, ही गाय तर मेली आहे, मग ती चारा कसा खाणार?" त्यावर कबीर म्हणाला, "महाराज, जर मेलेली गाय चारा खाऊ शकत नाही, तर मग तुमचे १०० वर्षांपूर्वी मेलेले पितर खीर कशी काय खाणार?" यावर साधू निरुत्तर झाला! मराठी अनुवाद: गंगाधर टिपरे

254 likes 64 shares
WhatsApp