Back to feed
J
Jiya Patel Love · Marathi · Missing

एकदा तरी तू मला समजून घ्यायचं होतंस हळूच कधीतरी मला मिठीत तुझ्या घ्यायचं होतं मिठीत तुझ्या असताना मला ही खूप रडायचं होतं नकळत डोळ्यात आलेलं पाणी माझ्या एकदा तरी पुसायचं होतंस हे शोना नको ना गं रडू मला नाही बघवत एकदा तरी म्हणायचं होतंस माझ्यापासून दूर जाताना मागे वळून एकदा तरी बघायचं होतंस दुखी असताना मी एकदा तरी विचारायचं होतंस आनंदात माझ्या एकदा तरी तू हि रमायच होतंस नको ना गं जाऊस सोडून मला तुझ्याविना अवघड आहे सारे एकदा तरी सांगायचं होतंस थांबले असते मी आयुष्यभर तुझ्यासाठी मला एकदा तरी थांबवायचा होतंस...

0 likes 0 shares
WhatsApp