*एकदा तरी वाचावे असा लेख* मध्यंतरी वाचण्यात आलेल्या एका इंग्रजी कथेचा स्वैर अनुवाद. मूळ लेखक माहित नाही. *पण त्यास प्रणाम* ================== मास्तर एमएच्या वर्गात एक गोष्ट सांगत असतात. एका प्रवासी जहाजाचा समुद्रात अपघात होतो. या जहाजावर एक जोडपं पण असतं, वाट काढत जेंव्हा ते लाइफ बोटीजवळ येतात तेंव्हा त्यांच्या लक्षात येते कि एकच जागा शिल्लक आहे. त्या क्षणी नवरा बायकोला मागे ढकलतो आणि स्वतः बोटीत जावून बसतो. बायको उभी राहते आणि नवऱ्याकडे बघून एकच वाक्य जोऱ्यात ओरडते. आता मास्तर थांबले आहेत आणि त्यांनी वर्गाला विचारले " काय वाटते तुम्हाला, काय म्हणाली असेल ती बाई आपल्या नवऱ्याला " बहुतांश विध्यार्थी म्हणाले..... " बाई म्हणाली असेल, स्वार्थी माणसा, काय हे केलेस, माझ्या प्रेमाची ही कदर, मीच आंधळी होती रे " एक जण मात्र काहीच बोलत नव्हती, शांतता झाल्यावर ती म्हणाली " ती बाई म्हणाली असेल कि आपल्या पिल्लाची काळजी घे " मास्तर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या मुलीला विचारले " बाळा तुला कसे माहित, हि कथा तू आधी ऐकली आहेस का " मान हलवत ती मुलगी म्हणाली, नाही पण माझ्या आईनी माझ्या बाबांना हेच सांगितले होते, कॅन्सरनी मरण्याच्या अगोदर " मास्तर म्हणाले, " बरोबर आहे तुझे उत्तर " जहाज बुडाले, बाईचा जीव गेला, तो माणूस घरी परत आला आणि अक्षरशः तळहाताच्या फोडा सारखे जपत आपल्या कन्येला मोठ केले. काही वर्षानंतर तो माणूसही निजधामास गेला. काही दिवसानंतर वडीलांची खोली आवरत असतांना त्या मुलीस आपल्या वडीलांची डायरी मिळाली. डायरी वाचतांना कन्येच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. टर्मिनल कॅन्सरनी ग्रस्त असलेल्या पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठीच ते जहाजावर गेले होते. त्या माणसानी लिहिले होते "प्रिये, त्या अथांग सागराच्या तळाशी मलाही तुझ्या बरोबर निजधामास जायचे होते पण फक्त आपल्या मुलीसाठी मी तुला एकटीला जावू दिले" कथा संपली आणि वर्गात निरव शांतता पसरली. कथेचा मथितार्थ विद्यार्थाना समजला होता. आपण वर वर बघून सर्व गोष्टींना जज करतो पण आपण त्यांच्या भावना, अडचणी समजून घेत नाही, काही मित्रांचा हात खिश्यात बिल देण्यासाठी सर्वात आधी जातो कारण त्याला मैत्रीची कदर असते. ना की त्याच्याकडे अमाप पैसा असतो, काही व्यक्ती सर्वात आधी पुढे येवून कामाला लागतात कारण त्यांना जवाबदारीची ओळख असते, भांडणानंतर प्रथम माफी मागणारा नेहमीच चूक असेल अस नाही, कदाचित त्याला तुमची खूप कदर असते, तुम्हाला मदत करणारे तुमचं काही देणं लागत नसतात पण ते तुमच्यात सच्चा दोस्तं शोधत असतात, तुम्हाला मेसेज पाठवणारे वेडे नसतात, त्यांना तुमची गरज असते, एक दिवस असा येईल कि आपण सर्व किंवा काही जण एकमेकांपासून दूर जातील, आपल्या गप्पा मिस करू, एकत्र बघितलेली स्वप्न कदाचित पूर्ण झाली असतील पण दोस्त सोबत नसेल. दिवस, महिने, वर्षे जातील, त्वचेवर सुरकुत्या येतील, केस पांढरे झालेले असतील, चालायला काठी लागेल. मैत्रीचा कैलेडीओस्कोप आपण फोटोत बघत असतांना कदाचित तुमचा नातू/नात तुम्हाला बिलगून विचारतील " हे सगळे कोण आहेत " डोळ्यात पाणी न आणू देता आणि दाटलेल्या सुरात तुम्ही म्हणाल....... *" बाळा, ही ती सगळी मंडळी आहेत ज्यांच्यासोबत मी माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ घालवला."* सौजन्य - इंग्रजी पुस्तक
A
Aarav Patel
Friendship · Marathi · Friendship
220 likes
32 shares