Back to feed
V
Vihaan Bagale Life · Marathi · Life

कोण आहेस तू नक्की ? वाहता वारा की झुळूक अलवारशी, मनाला आल्हाद देणारी. कोण आहेस तू नक्की ? उनाड वळीव की सर श्रावणातली, रोमांच फुलवणारी. कोण आहेस तू नक्की ? माळरानातील चाफा कि इवलीशी रातराणी, सुगंधी स्वप्नं जपणारी. नक्की कोण आहेस? माझ्या अस्तित्वातला श्वास कि मला व्यापून उरणारी तू.

186 likes 56 shares
WhatsApp