Back to feed
A
Aditya Sharma Life · Marathi · Life

*कोण काढणार मोर्चे, कोण लावणार मेणबत्त्या.....?* हवालदार रवी पाल, जम्मू, सिपॉय राकेश सिंग, बिहार, सिपॉय जवरा मुंडा, झारखंड, सिपॉय जानराव उके, महाराष्ट्र, सिपॉय बिस्वजीत गोराई, पश्चिम बंगाल, लान्स नाईक आर. के. यादव, उत्तर प्रदेश. *काल उरी येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या काही जवानांची ही नावे.* *कोण होते हे लोक?* मराठा, दलित, आदिवासी ओबीसी, ब्राम्हण की अजून कोण? *कुठली भाषा बोलत होते ते?* हिंदी, मराठी, बंगाली की डोग्री? *कुठल्या नदीचं पाणी पीत होते ते?* कावेरी, कृष्णा, हुगळी की गंगा? वर्ण *कुठला होता त्यांचा?* गव्हाळ, गोरा की सावळा? *ह्या सतरा सैनिकांचा रंग, वर्ण, भाषा, जात, धर्म सगळं एकच होतं, त्यांचं भारतीय असणं.* का गेले होते ते सीमेवर लढायला? त्यावेळी, आगीने वेढलेल्या तंबूत, धुराने कोंडलेल्या त्या जागेत होरपळत असताना कुणाचे विचार आले असतील त्यांच्या डोक्यात? भिडतंय का आपल्याला त्यांच्या मृत्यूचं दुःख आत कुठंतरी, चिरत, चिरफाळत जातंय का ते दुःख आपल्या पोटाच्या देठापर्यंत? आपल्या घरातलंच एखादं माणूस गेलंय असं सुन्न करणारं दुःख होतंय का आपल्याला? राग येतोय का इतका? *एक कोण रोहित वेमुला जीव काय देतो आणि सगळा मीडिया त्याच्या नावाने गळे काढून रडतो. एक याकूब मेमन फाशी दिला जातो आणि त्याच्या अंत्ययात्रेला मुंबईत लाखो लोक जमतात. एक बुऱ्हाण वाणी मारतो आणि त्याच्या "गरीब हेडमास्टर" बापाचं उदात्तीकरण सुरु होतं आणि हे सगळं करतं कोण, तर भारतीय पासपोर्ट मिरवणारे, आपलेच लोक. कावेरीच्या पाण्यावरून आपण रस्त्यावर येतो, भाषेच्या प्रश्नावरून आपण रस्त्यावर येतो, आरक्षण पाहिजे ह्या मागणीवरून तर दर तीन-चार महिन्यांनी लाखो लोक रस्त्यावर उतरतात.* *पण ह्या सैनिकांसाठी कोण रस्त्यावर उतरणार आहे?* कोण काढणार आहे मेणबत्ती मोर्चा त्यांच्यासाठी? आणि समजा...... *उद्या काढलाच कुणी तर आपल्यापैकी किती लोक लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत?* आपल्याला पाहिजे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं. आपल्याला पाहिजेत गुलाम अलीच्या कॉन्सर्टची तिकिटं. आपल्याला पाहिजेत अमन के तमाशे आणि बजरंगी भाईजान सारखे बिनडोक भावनाप्रधान चित्रपट. आज सतरा मेले, उद्या पंचवीस मारतील. काय फरक पडतो कुणाला ह्या देशात? सैनिक काय माणसं आहेत? त्यांना कसले मानवी हक्क? मानवी हक्क असतात ते केवळ दहशतवाद्यांना, खुन्यांना, बलात्काऱ्यांना आणि ह्या देशाच्या राजधानीत "भारत तेरे तुकडे होंगे" अश्या उन्मादी घोषणा देणाऱ्या भाडोत्री क्रांतिकाऱ्यांना. *भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी वगैरे सगळी गाणी फक्त रेडियोवर कधी-मधी ऐकण्यासाठी, खायला मात्र आम्हाला कराची स्पेशल बिर्याणीच लागते हां!* लेखिका - *शेफाली वैद्य*

140 likes 79 shares
WhatsApp