Back to feed
D
Dhruv Mehta Love · Marathi · Missing

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण.... तरीही डोळे भरतातच ना ? मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ? हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी.... तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना.... ??? लाख झाला असेल मनाचा दगड.... तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??? जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना....??? या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य.... पण..... तरीही जीव जडतातच ना....???

0 likes 0 shares
WhatsApp