कुणितरी आठवण काढतंय बाकी काही नाही। <3 <3 हसता-हसता डोळे अलगद येतीलही भरुन, बोलता-बोलता शब्द ओठी जातीलही विरुन, कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही, कुणितरी आठवण काढतंय बाकी काही नाही। <3 <3 रस्त्यामधे दिसतातच अनेकानेक चेहरे जाता-येता, एकसारखेच दिसू लागतील सहज बघता-बघता, सृष्टीमधे दोन जीवांशिवाय आणखी कुणीच नसेल, भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही, कुणितरी आठवण काढतंय बाकी काही नाही। <3 <3 मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यागत वाटेल, जूनाच काढून एसएमएस पून्हा वाचावंसं वाटेल, पाऊलो पाऊली जड होत जाईल असा हा श्वास, घाबरुन विबरुन जाण्यासारखं बिलकूल काही नाही, कुंणितरी आठवण काढतंय, बाकी काही नाही। <3 <3 जेवता-जेवता लागेलही कधी जीवघेना ठसका, घरचे म्हणतील, कसा रे लागतो तूला असा नूस्ताच ठसका, बोलण्याआधी सांभाळावे आवाजाला थोडे, सांगून द्यावं काळजी घेण्या ईतपत बिलकुल काही नाही, कुणितरी आठवण काढतंय बाकी काही नाही।। कुणितरी आठवण काढतंय, बाकी काही नाही।।
0 likes
0 shares