Back to feed
A
Aarav Sharma Life · Marathi · Life

कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये आपण मात्र आयुष्य भर कुणाला झिडकारू नये आपुलकीचा विणला गोफ आपण कधीच उसवू नये नशीबाने जुळलेली नाती जपावी पण तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघङ वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसर्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे.......

239 likes 57 shares
WhatsApp