Back to feed
S
Shaurya Bagale Patriotic · Marathi · Patriotic

*कोणीही पॅनिक अवस्था निर्माण करू नये । नोटा बंद झाल्या। परंतु आपल्याकडे असलेल्या नोटा आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत भरा। नोटा बदलण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही। परवा बँका उघडल्यानंतर गर्दी करू नका। 50 दिवसात आपण सर्व पैसे बँकेत जमा करा व लागेल तेव्हढेच पैसे काढा। देशासाठी हे काम आपल्याला करावेच लागेल। परत विनंती कि, उगीच पॅनिक परिस्थिति तयार करू नका, व कोणी तयार करत असेल तर त्यालाही थांबवा। मेडिया, टीव्ही, सोशल मीडिया, व्हाट्स अँप, फेस बुक इ वर फार विश्वास ठेवू नका। उगीच अफवा पसरविणारे मेसेज पुढे पाठवू नका। सर्व काही सरकारने करावे या मानसिकतेतून बाहेर पडू व आपल्या तसेच आपल्या पुढील पिढीच्या व देशाच्या चांगल्या भविष्यासाठी, आपणच आपली मदत करू, एकजूट करून काळा पैसा विरुद्ध लढू* 🇮🇳वंदे मातरम🇮🇳

68 likes 52 shares
WhatsApp