किती छान असतं ना ?आपण कुणालातरी आवडणं...कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं.... खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं... कुणाच्यातरी पर्सनल डायरितआपलं नाव असणं ,चार-चौघात कुणीतरी सतत आपलाचउल्लेख करणं,किती छान असतं ना ?आपण कुणालातरी आवडणं...कुणीतरी आपलं हसणंकाळजात साठवनं ,कुणालातरी आपला अश्रू मोत्या समान वाटणं...किती छान असतं ना,आपण कुणालातरी आवडणं....कुणीतरी आपल्या फोनची तासनतास वाट पाहणं ,आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी ,तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,देव समोरही स्वता आधीआपलं सुख मागणं ,खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं...कुणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं ,आपल्या उपवासा दिवशीत्यानं ही हटकून उपाशी राहणं,खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं...कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं..झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....खरच, खूप छान असतं नाआपण कुणालातरी आवडणं.....
J
Jiya Agarwal
Love · Marathi · Motivation
0 likes
0 shares