किती छान असतो ना खेळ मनाचा कोणाच्या तरी आठवणीत रमण्याचा कोणाला तरी स्वप्नात पाहण्याचा कोणाला तरी जपण्याचा किती छान असतो ना खेळ मनाचा किती छान असतो ना खेळ मनाचा आपण कोणाचे तरी आहोत या सुखात जगण्याचा आपले कोणीतरी आहे हे रोमाँच अनुभवण्याचा किती छान असतो ना खेळ मनाचा किती छान असतो ना खेळ मनाचा पाहिलेले स्वप्न खोटे होते हे कळल्यावर मनाने उद्ध्वस्थ होण्याचा सर्व काही संपले या जाणिवेने रात्र रात्र रडण्याचा खरेच किती छान असतो ना खेळ मनाचा
0 likes
0 shares