Back to feed
S
Sara Agarwal Love · Marathi · Missing

किती तरी दिवसांनी ती मला भेटणार होती... त्या असह्य विरहाचा आता अंत होणार हॊता.. तिला भेटण्यासाठी खुप अधीर मी झालोे होतो खास तिच्यासाठी तयार होवुन, तिच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलोे होतोे.. तिच्या आठवणीत इतके दिवस काढले होते पण आताचे हे काही क्षण खुपच मोठे वाटत होते, ति आली की तीला डोळे भरुन पहायचं होतं तिच्या मिठीत शीरुन बाकी सगळं विसरायच होतं, इतक्यात तिची येण्याची चाहुल लागली आणि माझ्या ह्रदयाची स्पंदन वाढली...... पण बराच वेळ वाट पाहुनही ती तर आलिच नाही...... का आली नसेल ति हे काही मला कळलेच नाही..... विसरलि असेल ती मला....? कि भेटायची ओढच राहिली नाही तिला? वेळ जात होती तसं मनात शंका कुशंकांच काहुर माजत होतं...... तिच्या आठवणीने ह्रदय अगदी व्याकुळ झालं होतं संयमाचा बांध तुटून एक अश्रु माझ्या गालावरुन ओघळला..... इतक्यात अचानक तिचा तो सुखावणारा स्पर्श झाला..... ऊशीर झाला येण्यास म्हणुन sorry म्हणाली.. मग तिच्यावर रागवू तरी कशा...... कारण आज माझि ती प्रिय सखी ’पाऊस’ मनसोक्त बरसून..... मला चिंब भिजवुन गेली..... कधी कधी असं वाटतं, कुणासाठी तरी मरायला हवं , क्षणभर का होईना आपल्यासाठी, कुणीतरी झुरायला हवं... दुरगेलेल्या पावलांनी, आपल्यासाठी वळायला हवं.... आपल्या मनात प्रेम आहे.. हे कुणाला तरी कळायला हवं.. ♥♥

0 likes 0 shares
WhatsApp