*कृतज्ञता वर्षाअखेरीसची* 🔸व्हाट्स एपच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराचे जे ज्ञान फुकट प्राप्त झाले ते ज्ञानकण वाटणाऱ्या सर्व ज्ञानी जनांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. 🔸वय गेल्यानंतरही मला ज्यांनी ज्यांनी नौकरीच्या संधीच्या जाहिराती पाठवल्या त्यांना माझ्यातील चाकरक्षमतेबद्दल विश्वास असल्याचे पाहून मी नम्र झालो. 🔸पिंपळाच्या पानापासून ते तुळशीच्या पानांचे उपयुक्त गुण वाचूनच मी पुनःश्च ठणठणीत बनलो. 🔸पत्नी म्हणजे काय ह्याबद्दलचे दीर्घ चिंतन वाचूनच मी कौटुंबिक सद्गृहस्थ बनलो. 🔸कोकाटे ह्या एकाच मुलाचे सर्टिफिकेट हरवल्यावर ते त्याचे त्याला मिळावे म्हणून अख्खा महाराष्ट्र धडपडला हे पाहून मी तर ओलावून गेलो . 🔸लोकांची किमान सकाळ तरी चांगली जावी ह्यासाठी शुभेच्छा देणारे अगणित असतात ह्याची जाणीव मला झाल्याने सुसंकृत असल्याचा आनंद झाला. 🔸प्रत्येक व्हाट्स एपधारी योद्धा हा चित्रपट ,लेख,घटना ह्यावर ज्या तेजाने फटकारे मारतो ते वाचून देशातील क्षात्रतेज वर्धिष्णू होत असल्याचा मला अभिमान वाटला. 🔸असे बरेच ज्ञानकण वेचून मीही तेजपुंज झाल्याने ही कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 🔸नववर्षाच्या शुभेच्छासह।
194 likes
15 shares