Back to feed
K
Krishna Kulkarni Friendship · Marathi · Friendship

कधी शांत झोपलेल्या बाळा कडे एकटक पाहिल आहेस का ? पाहून बघ.. त्याच्या चेहरयावरील निरागसता खुप काही सांगते समजून बघ.. कधी स्वतःसाठी वेळ काढला आहेस का ? काढून बघ.. तुझ्या आतही कुणाला तरी तुझ्याशी बोलायच असत ऐकून बघ.. कधी एखाद्या गाण्यात सार काही विसरून रमलेला आहेस का ? रमूण बघ.. त्यांतिल शब्द गुन-गुनताना तुझ्या मनात उठनारे भावना तरंग पकडून बघ.. कधी आई-बाबांना कमायितून एखादी भेट दिली आहेस का ? देवून बघ.. तुझ्या त्या छोट्याश्या वस्तुमुळे त्यांना झालेला मोठासा आनंद अनुभवून बघ.. कधी मित्रांसोबत रात्रभर मनसोक्त गप्पा मारल्या आहेस का ? मारून बघ.. निघणाऱ्या प्रत्येक विषयातिल हास्याचे रहस्य उमजुन बघ.. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला शक्यतो मदत केलि आहेस का ? करून बघ.. काही एक संबंध नसताना यामुळे त्याकडिल आशीर्वाद घेवून बघ.. कधी कुणावर अपेक्षा विरहित प्रेम केल आहेस का ? करुन बघ.. प्रेमातुन तुझ्या त्या सोबति ला मिळणारा समाधान जाणून बघ.. कधी कुणा वृद्ध व्यक्तिशी तासन-तास बोलला आहेस का ? बोलून बघ.. त्याच्या आयुष्यभरातील अनुभवाचे बोल खुप काही शिकवून जातात शिकून बघ.. आपल्या प्रत्येकाला जिवन खुप काहि देत असत घेवून बघ.. छोटसं आयुष्य खुप काही जगायला सांगत जगुन बघ..

165 likes 77 shares
WhatsApp