Back to feed
K
Krishna Nair Life · Marathi · Life

कधीतरी येईलच दिल्ली......... कधीतरी येईलच दिल्ली, गाडीमध्ये बसल्यावर ! स्वप्नांनाही फुटतील पंख , उंच भरारी घेतल्यावर ! येतील अडथळे , सुटेल धीर , खेचतील कोणी पाय ! मात कर सर्वांवर, शोधून त्यावर तरणोपाय प्रवास तर करावाच लागेल , सुंदर दिल्ली बघायला ! येतील स्टेशने अनोळखी, मिळतील तुला अनुभवायला ! ओळखी होतील नव्या , जुळतील नवी नाती एखादा भेटेल सखा , होईल तुझा सांगाती गप्पा टप्पा , मजा -मस्ती प्रवास असेल सुखकर सगळे काही करताना ध्येयाचा नको पडू दे विसर ! एखादा प्रवासी भूलवेल, सांगेल तुला काही बाही टक्क डोळ्यांनी प्रवास कर, झोपून जराही चालणार नाही प्रवासाचा येईल शीण , थोडीशी टेक अंमळ टवटवीत हो छान , तुझ्या पंखात येऊ दे बळ टप्या टप्याने प्रवास होऊन दिल्ली येईल अंती विजयश्री असेल तुझी, पण संपणार नाही भ्रमंती दिल्ली म्हणजे शेवट नाही, जीवनात ध्येय असावीत अनेक आकाश आहे विस्तीर्ण , पंख विस्तार आणि गाठ एकएक....

71 likes 80 shares
WhatsApp