Back to feed
N
Nisha Gupta Friendship · Marathi · Friendship

⚔ कोपर्डी तिथून सुरू होते ...! ⚔ तुमच्या गावातील शाळेच्या वाटेवर शाळा सुटल्यावर फिरणारी गिधाड नजरेची डुक्करे ( ती प्रत्येक जातीची असतात कधी कधी आपल्या नात्यातील पण) ....कोपर्डी घटना तिथून सुरू होते ...! तुमच्या गावातील तरूणाच्या मोबाईल मेमरी मध्ये अश्लील व्हिडीओ लपून ठेवलेले असते .. .दोन चार टाळकी ती बघत बसतात ..इतरांना दाखवतात ( ती प्रत्येक जातीतील प्रत्येक धर्मातील असतात कधी कधी तुमच्या नात्यातील असतात ) ....कोपर्डी तिथून सुरू होते ... गावातल्या / शहरातल्या सार्वजनिक सणात , लग्नात , शाळेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात जेव्हा मुली नटून थटून आलेल्या असतात ... कुत्र्याची फौज चालते तशी पावले चालतात घाणेरड्या comments पास केल्या जातात ( ती प्रत्येक जाती धर्मातील असतात आणि कधी कधी तुमच्याच नात्यातील असतात ) ...कोपर्डी तिथून सुरू होते ... बीअरच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो हातभट्टीच्या पॅगचा भरभार झालेला असतो डोक्यात विकृतीचा किडा वळवळत असतो आणि हा पशु फक्त शिकारीची वाट बघतो ( ते प्रत्येक जाती धर्मातील असतात कधी कधी तुमच्या नात्यातील असतात ) ...कोपर्डी तिथून सुरू होते .... ....म्हणून मित्रांनो यावर उपाय म्हणून चिंतन करा विचाराचे मंथन करा .. चारित्र्य आणि शीलवान पिढीच्या निर्मीतीसाठी ..अपार मेहनत करा भविष्यात अशी दुसरी कोपर्डी घडू नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करा .. Forwarded

128 likes 58 shares
WhatsApp