करियर ------------- ATC ,हवाई वाहतुक नियंत्रक अर्थात Air Traffic Controller. जहभर हवाई वाहतुक वाढत चालली आहे। प्रवासी वाहतुक, माल वाहतुक, युद्ध, संशोधन यासह अनेक क्षेत्रात विमानांचा वापर वाढला आहे। याच सोबत नवीन विमानतळाची बांधणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। विमानतळावर एक उंच गोलाकार व चहुबाजुल़ा काचा असलेली एक ईमारत असते। ती ईमारत हवाई वाहतुक नियंत्रण कक्ष असते। याच ईमारतीतुन विमानांचे आवागमन नियंत्रीत केले जाते। विमानाचे ऊड्डाण, विमान ऊतरणे ,आकाशात विमानाची योग्य दिशा व उंचीवर आहे कि नाही, हे पाहणे अशा अनेक प्रकारच्या तांत्रीक गोष्टिंचे नियंत्रण air traffic controller ATC मार्फत केले जाते। एखादे विमान अपघातग्रस्त झाले तर सर्व प्रथम हवाई नियंत्रकाशी शेवटचा संपर्क किती वेळा पुर्वी झाला? हे पाहतात। सतत हवामान खात्याच्या संपर्कात रहाव लागत। कधिही आणीबाणीची परिस्थिती ऊद्भवु शकते। त्याकरिता नेहमीच तयार रहाव लागत। भारतात व जगभर या क्षेत्रात कायमच कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असते। याच्या परिक्षेचा निकाल अर्धा टक्या पेक्षा कमी लागत असतो। दर तीन महिन्याला याच्या परिक्षा होत असतात। परिक्षा या भारत सरकारच्या Ministry of electronic and telecommunication विभागा मार्फत होत असतात। याची भाषा सुद्धा वेगळी असते। एखाद्या जपानी हवाई नियंत्रकाने जर्मनी अथवा रशियन पायलटला सुचना दिल्या तर भाषा ऊच्चारणातील दोषा मुळे चुकिचा अर्थ लाऊन मोठाच अनर्थ होऊ शकतो । या करिता वेगळीच भाषा वापरली जाते। जी पायलट साठी सुद्धा अनिवार्य आहे। ज्या ऊमेदवारां मधे खालील गुण आहेत त्यांनी या क्षेत्राचा जरुर विचार करावा। * Good communication skill * Good listening skill * Clear and concise ( संक्षीप व स्पष्ट संदेश) *Concentration skill * Maths
134 likes
25 shares