Back to feed
D
Diya Bagale Life · Marathi · Life

कलाकारांना एकदा सेलीब्रेटी स्टेट्स प्राप्त झाले की, त्यांना सामान्य माणसासारखे आयुष्य जगता येत नाही. ते सार्वजनिक ठिकाणी दिसले की लोक त्यांना गराडा घालतात. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन एखाद्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचून दाखव असे आव्हान युवागिरी कार्यक्रमाच्या टीमने नुकतेच सोनाली कुलकर्णीला दिले होते. तिनेदेखील हे आव्हान हसत पूर्ण केले. अंधेरीतील एका मंडळाचा गणपती तिथले लोक मंडपात घेऊन जात होते. त्याचवेळी सोनाली तिच्या गाडीतून पोहोचली. कोणाला कळायच्या आत ती त्या घोळक्याचा एक भाग बनली आणि बेफाम होऊन नाचली. लोकांनी तिला ओळखल्यानंतर तेदेखील आपल्या या आवडत्या अभिनेत्रीला पाहून खूपच खूश झाले.

67 likes 15 shares
WhatsApp