Back to feed
K
Kabir Gupta Life · Marathi · Life

कविता - झाले इतके तरीही... ------------------------------------------------------ चालत राहिली तसा , रस्तेच कळाले नाही | दिसले खूप जाताना , पायांना कळाले नाही || विचारले लोकांना तरी, त्यांनाही कळाले नाही | सांगितले त्यांनी जेजे , मलाच कळाले नाही || अर्थ शोधला त्यातला , नेमके कळाले नाही | थांबावे की चालावे हे , मनास कळाले नाही || झाले इतके तरीही , काहीच कळाले नाही | कशा साठी असे सारे ,अजून कळाले नाही ||

223 likes 10 shares
WhatsApp