Back to feed
A
Anika Agarwal Life · Marathi · Life

कशी सरता सरेना खुळी जगण्याची आस विझू आल्या देहातही आसक्तीचे दृढ पाश.. चिंब चिंब भिजूनही जीव कोरडाच सारा वासनेच्या सागराला नाही तृप्तीचा किनारा असो भोवती कितीही जिव्हाळ्याचा गोतावळा ज्याच्या त्यालाच सोसाव्या लागतात दुःख-कळा ठावे जरी प्रत्येकाला आहे एकदा सरणे उरण्यासाठी तरीसुद्धा चालू असते झुरणे..!!!

68 likes 45 shares
WhatsApp