कश्या करू मी कविता आता कसे रचू मी शब्द.... लिहाव तर खुप काही वाटत होत सये तेव्हा..... अस्तित्व होत तुझ माझ्या जीवनात जेव्हा...... तू म्हणायचीस तेव्हा माझ्यावर पण एखादी कविता कर ना आता तर माझे शब्दच माझ्यावर रुसले....... आठवणीत तुझ्या चार शब्द कागदावर रचले........ पुढे लिहाव म्हटल पण..???? क्षणात सारे बोल कंठात येऊन दाटले...... डोळ्यातंन ओघळलेले अश्रू टप टपा कागदावर टपकले...... अश्रुच्या धारेमध्ये लिहलेले शब्द ही त्या सवे वाहून गेले......
0 likes
0 shares