केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?😳 नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?😳 केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ??😳 कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ... 😊 कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊 कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊 कधी एखाद्या उपाश्याला घास भरवुन बघ...😊 कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊 कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊 कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ....😊 कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ...😊 एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !!😊 जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇 पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇 सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत...😇 आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇 शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳 शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳 शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔 आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳 पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला फूटपाथवर...😔 म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔 शेकडो मैल चालतो वारकरी...😳 अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! 😊 वाचा, विचार करा, आणि पटल तरच पुढे पाठवा.... 💐💐🙏🙏🙏
91 likes
57 shares