Back to feed
D
Diya Mishra Life · Marathi · Life

कह्याले बाता हन्ता..!! हजाराच्या नोटीनं या, लै जेरीस आनलं। "अच्छे दिन वाल्या"ला, आम जनतेनं मानलं..! पंजाची सत्ता तव्हा, लै बरी वाटली। इटलीच्या मॅडमीनं, खिरापत बी वाटली। तिचं काय जात व्हतं, तव्हा कळलं नाही। दोरी जळली तरी, सुम्भ जळलं नाही। हजार-पाचशेच्या तव्हा, गोळा केल्या नोटा। पाठीत आज बसला, "चायवाला" सोटा। पोत्यात घालू की, नोटा फाडून टाकू..? काय करावं म्हंत्यात, नक्षलवादी डाकू..? "घड्याळी"वाले मोठे मासे, चिडीचुप बसले। धरणात मुतनारे, पुरतेच फसले..! धनुष्याला कळना, धरावं का सोडावं...? फुसक्या डरकाळ्या देत, बोटं कोणावर मोडावं..? इंजिनानं मागं पाहाता, डब्बेच नव्हते काही। तावा-तावानं बोलून, पदरी काहीच नाही..! छप्पन इंची छातीची, पप्पूला बसली धडकी। दाढी कराया पैसा नाय, अशी आनली कडकी। काळ्या पैशे-वाल्याची, रातीतून लावली "वाट"..! भले-भले नोटावाले, झाले लंबे-लाट...!! सारं जग मानतय, सन्याशाची बात। गब्बरायच्या इथं बसे, पेकाटात लाथ। "चायवाला" बसला, आता मना-मनात। सामान्य माणूस सुखी, कष्टाच्या धनात...!! एवढं तुम्ही ध्यानी घ्या, जागी झालीय जन्ता। "हात जोडा कष्टाले" कह्याले बाता हन्ता..!! 🙏🏻NAMO🙏🏻

69 likes 21 shares
WhatsApp