खुप खुप छान नक्की वाचा... . दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न ... 1- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिती कोणती ? उत्तर- माता . 2- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ? उत्तर- "कापसाचे फूल". . 3- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ? उत्तर- पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध. . 4-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ? उत्तर- "वाणीचा" . 5- सर्वश्रेष्ठ दूध- उत्तर- मातेचे . 6- सर्वात काळे काय आहे ? उत्तर- "कलंक" . 7- सर्वात वजनदार काय आहे ? उत्तर- "पाप" . 8- सर्वात स्वस्त काय आहे ? उत्तर- सल्ला . . 9- सर्वात महाग काय आहे ? उत्तर- "सहयोग" . 10-सर्वात कडू काय आहे ? . उत्तर- "सत्य"... खुप सुंदर प्रश्न आणि त्या . प्रश्नाचे उत्तर . आयुष्य म्हणजे काय ???? . उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव "" नसतं पण " श्वास "" असतो आणि .... . ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव"" असतं पण श्वास नसतो. " नाव "" आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य... 🎈आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि, "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि, "आपले" कोण आहेत. 🎈"आयुष्य छान आहे"... "थोडे लहान आहे "... परंतु लढण्यात शान आहे. 🎈जग एक सापशिडीचा खेळ आहे. इथं शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत. 🎈चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. 🎈जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील. त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही. 🎈वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर, आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर. पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर. 🎈"चांगली वस्तू", "चांगली माणसे", "चांगले दिवस" आले की माणसाने "जुने दिवस" विसरू नयेत. 🎈रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते. पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागतं. 🎈"५ सेकंदाच्या छोट्याशा स्माइलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर "नेहमी" स्माइल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल". 🎈जिच्या उदरात जन्म होतो ती माता, आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन. 🎈मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. 🎈मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. 🎈तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.
119 likes
32 shares