खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ जावं.. बाहुपाशात घेऊन तुला..., सारं जगं विसरावं... गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं... दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं... आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं... उरलेल्या दिवसांसाठी, सुःख जरा मागावं... छेडून अंतरंगाची तार, सुःखद स्वप्नांना जागवावं...
0 likes
0 shares