खूप छान कविता वाचायला मिळाली… *भूतकाळात डोकावल्या शिवाय* *मजा काही मिळत नाही* *मागे वळून पाहिल्यावर* *हसावं का रडावं कळत नाही* *साऱ्याच गोष्टी मध्ये* *खूप खूप बदल झाले* *पहिल्या पेक्षा प्रत्येकाला* *नक्कीच बरे दिवस आले* *खरं वाटणार नाही पण* *एवढं सगळं बदललं* *निगरगट्ट माणूस सुद्धा* *मुळा सकट हादरलं* *शाळेतून घरी गेल्या गेल्या* *दप्तर कोनाड्यात जायचं* *दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना* *बाहेर काढल जायचं* *अहो दप्तर म्हणजे काय* *वायरची पिशवी असायची* *जुन्या फाटक्या पुस्तका सोबत* *फुटकी पाटी दिसायची* *अभ्यास कर म्हणून कुणी* *म्हणलंही नाही* *अन मार्क कमी पडले म्हणून* *हाणलंही नाही* *कोणताही ऋतू असो* *काळपट चहा असायचा*👌 *तडकलेल्या बशीवर* *कानतुटका कप दिसायचा* *बारा महिने अनवाणी पाय* *चप्पल म्हणजे श्रीमंती* *पायाला चटके बसायचे* *पण सगळ्या गावात हिंडायचे* *कुणाचं गुऱ्हाळ लागलं की* *चला रस प्यायला* *खळे दळे लागले की* *चालले शेतात झोपायला* *मरणाची गरिबी होती* *पण मजा मात्र खूप* *लग्ना कार्यात माणसं , नाती* *व्हायची एकरूप* *अमावस्येच्या दिवशी पोरं* *मारुतीच्या पारावर* *नारळाच्या टूकड्यासाठी* *एकमेकाच्या अंगावर* *ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं* *एकच गलका व्हायचा* *रेटा रेटी केल्यामुळं* *सदरा टरकून जायचा* *पाहुण्याला पाहुणचार म्हणून* *खिचडी भजे व्हायचे* *तेवढ्यातच सारयांचे* *डोळे भरून यायचे* *तेलच्या-गुळवणी आणि पापडांची* *काय मामलात होती* *तरीही त्या माणसां मधे* *माणुसकी होती* *रात्र रात्र गप्पा व्हायच्या* *डोळ्यात यायचं पाणी* *आडपडदा न ठेवता* *दुःखाची व्हायची गाणी* *कुठे गेला तो साधेपणा* *कुठे गेलं ते सुख ?* *खरं सांगा पहिल्या सारखी* *लागते का आता भूक ?* *इतकुसाक पेढ्याचा तुकडा* *मिडकू मिडकू खायचा* *कधी तरी कुणी तरी* *प्रसाद म्हणून द्यायचा* *सारं सारं संपून गेलं* *आता पैसा बोलत असतो* *माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा* *खोटं खोटं डोलत असतो* *पेढ्याच्या बाॅक्स कडे* *ढुंकूनही कुणी पहात नाही* *एवढंच काय पहिल्या सारख्या* *मुंग्याही लागत नाही* *सुखाचं बोट कधी सुटलं* *आपल्या लक्षात आलं नाही* *श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं* *तसं काही झालं नाहीे* *ते सुख आणि वैभव* *पुन्हा घरात येईल का ?* *चिरेबंदी वाड्या मधून* *हसण्याचा आवाज येईल का?😌😔😊* *🌳🌳🌳 माझं गाव🌾🌾🌾*
109 likes
16 shares